Tarun Bharat

विशालसिंग चव्हाणवर पोलिसांचा गोळीबार

बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणात होता फरारी : पोलिसांवर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न : गावठी पिस्तूल, चाकू जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोम्मण्णावर (वय 41) मूळचा राहणार हलगा-बस्तवाड, सध्या राहणार भवानीनगर यांच्या खून प्रकरणातील फरारी आरोपीवर मंगळवारी पहाटे पोलिसांनी गोळीबार केला आहे. पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयlनात असताना त्याच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळीबार करण्यात आला आहे.

विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25) मूळचा राहणार चिक्कनंदिहहळ्ळी ता. कित्तूर, सध्या राहणार शास्त्रीनगर, दुसरा क्रॉस हा गोळीबारात जखमी झाला आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी विशालवर दोन गोळय़ा झाडल्या असून त्याच्या डाव्या पायाला इजा पोहोचली आहे.

पळून जाण्याच्या प्रयlनात असताना विशालसिंगने यासीन नदाफ (वय 29) या क्राईम ब्रँचच्या पोलिसावर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलीस जखमी झाला आहे. विशालसिंग व यासीन या दोघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वीरभद्रनगर सर्कलजवळ हा थरार घडला आहे.

15 मार्च 2022 रोजी सकाळी रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोम्मण्णावर याचा भवानीनगर पाfरसरात खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली होती. अकरावा संशयित विशालसिंग चव्हाण हा फरारी होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंग³या, उपायुक्त रविंद्र गडादी आदी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथके कार्यरत होती.

विशालसिंग पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाललाहि गेले होते. मात्र, तो पोलिसांना सापडला नव्हता. सोमवारी मध्यरात्रीनंतर विशालसिंग वीरभद्रनगरजवळ मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळताच एसीपी एन. व्ही. बरमणी व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

वीरभद्रनगरजवळील कोयला हॉटेलनजीक विशालसिंगला अडविण्यात आले. पोलिसांवर चाकूने हल्ला करून पलायनाच्या प्रयlनात असताना त्याच्यावर दोन गोळय़ा झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याजवळून एक गावठी पिस्तूल, चाकू व पलायनासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. मार्केट पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना त्वरित अटक करा

Abhijeet Shinde

वीज तक्रारींच्या संख्येत घट

Patil_p

खानापुरात जनता आधार सौहार्द सहकारीचे उद्घाटन

Amit Kulkarni

भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद

Abhijeet Shinde

शॉर्टसर्किटमुळे कॅम्प येथे लागली आग

Amit Kulkarni

तालुक्यात बटाटा काढणीला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!