रायपूर :
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बुधवारी सीआरपीएफ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. जवानांनी नक्षलवाद्यांच्या तळावर छापा टाकल्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात सुमारे 5 ते 6 नक्षलवादी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जवानांची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांचा गट घनदाट जंगलभागात गायब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व अन्य सामुग्रीही जप्त केली. हे प्रकरण चिंतलनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.