Tarun Bharat

खाणमाफियांकडून पोलीस अधिकाऱयाची हत्या

Advertisements

हरियाणाच्या मेवातमधील धक्कादायक प्रकार

वृत्तसंस्था/ नूंह

हरियाणाच्या मेवातमध्ये खाणमाफियांनी पोलीस उपअधीक्षकाची हत्या केली आहे. पोलीस उपअधीक्षक सुरिंदर सिंह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अवैध खाणकामावर कारवाई करणाऱया पोलीस अधिकाऱयाच्या अंगावर माफियांनी ट्रक घातला आहे. या घटनेनंतर माफिया ट्रकसह फरार झाले आहेत.

पोलीस उपअधीक्षक सुरिंदर सिंह खाणमाफियांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. याचदरम्यान उपअधीक्षकांच्या शरीरावर खाणमाफियांनी ट्रक चढविला. यामुळे घटनास्थळीच सिंह यांचा मृत्यू झाला. नूंहच्या तवाडूमध्ये सुरिंदर सिंह पोलीस उपअधीक्षक म्हणून तैनात होते. सुरिंदर सिंह यांनी दगडांनी भरलेला एक डंपर रोखण्याचा प्रयत्न केला होता.

पोलीस उपअधीक्षक सुरिंदर सिंह हे चालूवर्षीच निवृत्त होणार होते. पचगावच्या पर्वतीय क्षेत्रात सिंह यांचा मृतदेह आढळला आहे. हरियाणाचे खाणमंत्री मूलचंद शर्मा यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत दोषींना शिक्षा मिळवून देणार असल्याचे म्हटले आहे. संबंधित भागात खाणकामाला अनुमती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी आरोपींच्या शोधाकरता मोहीम हाती घेतली आहे. हत्येच्या घटनेनंतर मोठय़ा संख्येत पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तर पोलीस उपअधीक्षकाच्या हत्येनंतर राज्य सरकारने अनेक पावले उचलली असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Stories

चार कामगार कायदा संहिता लागू करणार

Patil_p

लखीमपूर खेरी हिंसाचारातील मृतांची संख्या 9 वर

datta jadhav

करदात्यांना आयकर विभागाकडून 1.91 लाख कोटींचा परतावा

datta jadhav

1 एप्रिलपासून धावू लागणार सर्व रेल्वेगाडय़ा

Patil_p

‘चक्का जाम’साठी शेतकरी रस्त्यावर

Patil_p

ढगफुटीतील मृतांचा आकडा 16 वर

Patil_p
error: Content is protected !!