Tarun Bharat

भरपावसात पोलिसांचे पथसंचलन

प्रतिनिधी/ बेळगाव

बकरी-ईदच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी भरपावसात पथसंचलन केले. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी शहरात बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी लाल बहाद्दुर शास्त्राr चौकापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. खडक गल्ली, काकतीवेस, शनिवारखूट, खंजर गल्ली, दरबार गल्ली, खडेबाजार, टेंगीनकेरा गल्ली, भेंडीबाजार, आझाद गल्ली मार्गे पिंपळकट्टय़ापर्यंत जाऊन पथसंचलनाची सांगता करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, बी. आर. गड्डेकर, निंगनगौडा पाटील, मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांच्यासह अनेक अधिकारी या पथसंचलनात सहभागी झाले होते. पावसामुळे रेनकोट घालून पोलिसांनी पथसंचलनात भाग घेतला.

Related Stories

कंग्राळी लक्ष्मीदेवी वाढदिवस यंदा साधेपणाने करणार

Patil_p

मुलांचे आरोग्य पणाला लावू नका!

Patil_p

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

Archana Banage

स्पोर्ट्स अकादमी गदग,सिद्धारुढ स्वामी हुबळी विजयी

Amit Kulkarni

97 विद्यार्थ्यांमागे केवळ 3 शिक्षक

Omkar B

सेंटपॉल्स, सेंटमेरीज अंतिम फेरीत

Amit Kulkarni