Tarun Bharat

…अन् कोल्हापुरात पोलीसांनी घातली पाकिस्तानच्या ध्वजावरून गाडी

Kolhapur : कोल्हापुरात पीएफआय संघटनेच्या विरोधात हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाली आहे. एनएआय आणि एटीएसने केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनेने पाकिस्तानचा ध्वज जाळत कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन केली. पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन छेडले आहे. ‘जलादो जलादो, पाकिस्तान जलादो, पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना देखील पाकिस्तानच्या ध्वजावरून गाडी घालण्यास भाग पाडले. यावेळी पीएफआय संघटनेचा ध्वज आणि प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.

हिंदुत्ववादी संघटनेने पाकिस्तानचा ध्वज जाळत कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन केली.



दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आज पुन्हा ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून पीएफआयच्या देशभरातील कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी जवळपास १०० हुन अधिक जणांना अटक करण्यात आली होती. तर कोल्हापूर आणि हुपरी येथून देखील अटक करण्यात आली आहे. आज पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरुन मिरज येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पीएफआय संघटना देखील आक्रमक झाली आहे.

Related Stories

हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा दिलासा,रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 1 हजार 14 रुग्णांची वाढ, शहरात धोका वाढला

Archana Banage

‘गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य’ वाकरेत सलग २६ व्या वर्षी विधायक उपक्रम

Abhijeet Khandekar

कोगे येथे गरजू लोकांना पुरणपोळी दान करत साजरी केली होळी

Archana Banage

जि.प.कर्मचारी बदलीसाठी 305 अर्ज प्राप्त, शासन निर्देशानुसार 15 टक्के मर्यादेत होणार बदली

Archana Banage

युवासेनेचे कुरुंदवाड आगारास बससेवा सुरु करण्याचे निवेदन

Archana Banage