11 जणांवर गुन्हा, ग्रामीण पोलिसांची कारवाई
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील करबुडे मुळगाववाडी येथे अवैधरित्या चालणाऱ्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी जुगार खेळणाऱ्या 11 जणांवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. च्याकडून 44 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्री 1 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करबुडे मुळगाववाडी येथे अवैधरित्या तीनपत्ती जुगार चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरूवारी रात्री 1 च्या सुमारास ग्रामीण पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. यावेळी गोंधळ उडाल्याने अन्य पळण्यात यशस्वी झाले तर 11 संशयित पोलिसांच्या हाती लागले. त्याच्याकडून 44 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात 23 हजार 540 रूपयांची रोख रक्कम, 5 मोबाईल, जुगाराचे साहित्य आदींचा समावेश आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये विजय किसन नेवरेकर (41, ऱा काजरेकोंड करबुडे), कृष्णा गोविंद तांबे (58), गंगाराम सोनू तांबे (65), समीर यशवंत कळंबटे (39), भिकू सखाराम सोनवडकर (41), रवींद्र लक्ष्मण कळंबटे (39), अनिल गणपत कळंबटे (41), धोंडू सोनू सोनवडकर (70), मंगेश तानू सोनवडकर (36), बंडू लखमा तांबे (37), शांताराम गणपत सोनवडकर (43, रा सर्व करबुडे मुळगाववाडी) आदींचा समावेश आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सर्व संशयितांविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जोशी करत आहेत.