Tarun Bharat

केरळमध्ये भाडेतत्वावर मिळणार पोलीस

700 रुपयांमध्ये कॉन्स्टेबल तर 2560 रुपयांमध्ये पोलीस निरीक्षक : 33,100 रुपयांमध्ये पूर्ण पोलस स्थानक मिळणार

विवाह, वाढदिवस किंवा चित्रिकरण कुठल्याही कार्यक्रमासाठी आता पोलीस भाडेतत्वावर मिळविता येणार आहेत. दिवसभरासाठी गणवेशातील कॉन्स्टेबल तुम्हाला केवळ 700 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर पोलीस उपनिरीक्षक आणि स्थानक प्रमुखही भाडेतत्वावर प्राप्त करता येणार आहेत. केरळमध्ये लोकांना अशी अजब सेवा प्राप्त करता येणार आहे.

नव्या धोरणाच्या अंतर्गत चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी पोलीस स्थानकही भाडेतत्वावर घेता येणार आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर स्वतःची ओळख लवपून या धोरणाला तीव्र विरोध करत आहेत. पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला हे धोरण रद्द करण्यासाठी अर्ज दिला असल्याचे केरळ पोलीस ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी सांगितले आहे.

आयोजकांकडून निर्धारित शुल्क घेत चित्रिकरण, सोहळे इत्यादी कार्यक्रमांमध्ये सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची तरतूद पूर्वीपासूनच असल्याचा दावा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी.पी. सदानंदन यांनी केला आहे. कुन्नूरचे के. अंसार यांनी स्वतःच्या मुलीच्या विवाहात व्हीआयपी सुरक्षेच्या नावाखाली 2800 रुपये देऊन दिवसभरासाठी 4 कॉन्स्टेबल भाडेतत्वावर मिळविल्यावर हा विषय चर्चेत आला आहे. विशेष बाब म्हणजे या विवाहसोहळय़ात कुणीच व्हीआयपी सामील झाला नव्हता. 

वैयक्तिक कार्यक्रमांसाठी सुरक्षेचे निश्चित दर

  • कुठल्या स्तरासाठी                    किती भाडे
  • प्रतिदिन             रात्रीची सुरक्षा
  • कॉन्स्टेबल                   700                  1040
  • अतिरिक्त उपनिरीक्षक  1870                2210
  • पोलीस निरीक्षक                       2560                4360
  • स्थानक प्रमुख              3795                4750
  • कुणासाठी                   किती भाडे
  • श्वान                            6950
  • वायरलेस सेट               2315
  • पोलीस स्थानक                        33100
  • ठसेतज्ञ                                   6070
  • फॉरेन्सिक लॅब             12130 प्रति प्रकरण

Related Stories

दरवाज्याच्या आकाराच्या घराची किंमत 1 कोटी

Amit Kulkarni

9 वीच्या विद्यार्थ्याकडून ‘स्मार्ट शूज’

Amit Kulkarni

थेट मेंदूद्वारे करण्यात आला ट्विट

Patil_p

चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापना

Tousif Mujawar

डूडलच्या माध्यमातून गुगलचा ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांना सलाम!

Tousif Mujawar

लोखंडी फुफ्फुसांमध्ये अलेक्झेंडरचे जग

Amit Kulkarni