Tarun Bharat

प्रदूषण हटले… हिमालय दिसला

गेल्या शुक्रवारी पंजाबमधील जालंधरच्या नागरिकांना हिमालयाचे सुखद दर्शन बऱयाच कालावधीनंतर झाले आहे. वास्तविक जालंधरपासून हिमालय पर्वतरांगा 200 कि.मी. अंतर दूर आहे. मात्र, हवा प्रदूषणरहित म्हणजेच स्वच्छ असेल तर या शहरातील उंच इमारतींवरून हिमालयाच्या पर्वतरांगांचे मनोहर दर्शन घडते.

जालंधर हे औद्योगिक शहर असल्याने येथे सातत्याने हवा प्रदूषणग्रस्त असते. त्यामुळे दूरवरच्या हिमालयाचे दर्शन घडत नाही. मात्र, गेला आठवडाभर पावसाने कृपा केल्याने हवा स्वच्छ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिमालयाच्या पांढऱयाशुभ्र हिमाच्छादित पर्वतरांगा या शहरातील नागरिकांना दिसू लागल्या आहेत. त्या पाहण्यासाठी उंच इमारतींच्या स्लॅबवरती लोक गर्दी करत आहेत.

जालंधरमधून दिसणाऱया या हिमालयीन पर्वतरांगांना ‘धौलाधार की पहाडीया’ असे संबोधिले जाते. हिमालयातील डलहौसी या स्थानापासून थोडय़ा अंतरावर या बर्फाच्छादीत पर्वतरांगा आहेत. 20 वर्षांपूर्वी प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी या पर्वतरांगांचे दर्शन घडत असते. तथापि गेल्या दोन दशकांमध्ये मात्र प्रदुषणात मोठी वाढ झाल्याने हे दर्शन दुर्लभ बनले होते. कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊनमुळे कारखाने आणि उद्योग केंद्रे बंद होती. तेव्हा या शहरातून हिमालयाचे दर्शन घडले होते. आता यंदाच्या पावसाळय़ात पुन्हा तो योग आल्याने नगरवासी सुखावले आहेत. 2020 पासून 2021 पर्यंत सलग वर्षभर हिमालय दिसला होता. त्यानंतर पुन्हा तो अनुभव येईनासा झाला. यंदाचा मान्सून मात्र या कारणामुळे जालंधरवासियांना चांगलाच सुखावून गेल्याचे दिसत आहे.

Related Stories

नितीश कुमारांना धमकी, आरोपीला गुजरातमधून अटक

Patil_p

संगरूर पोटनिवडणुकीसाठी केवल सिंह ढिल्लोंना उमेदवारी

Patil_p

हिमाचल प्रदेश : चंबामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

अडकलेल्या भारतीयांसाठी धावला एक ‘छत्तीसगडिया’

Patil_p

64,527 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

कन्नड सक्तीसाठी कायदा आणणार!

Patil_p