Tarun Bharat

राहुल गांधींना मिळाली पूजा भट्टची साथ

भारत जोडो यात्रेत सहभागी झाली अभिनेत्री

वृत्तसंस्था/ हैदराबाद

अभिनेत्री पूजा भट्ट बुधवारी हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सामील झाली. ही यात्रा सध्या तेलंगणात सुरू आहे. काँग्रेस पक्षाने पूजा भट्टच्या यात्रेतील सहभागाची छायाचित्रे अन् चित्रफित सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘दरदिनी एक नवा इतिहास रचला जात असून देशात काँग्रेसवर प्रेम करणाऱयांची संख्या वाढतेय’ असे काँग्रेस पक्षाने नमूद पेले आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला समर्थन देणाऱया बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये पूजा भट्टचा समावेश आहे. यापूर्वी स्वरा भास्करने राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेचे कौतुक केले होते. ‘निवडणुकीतील पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक टीकाटिप्पणी होत असूनही राहुल गांधी हे सांप्रदायिक शक्तींसमोर झुकले नाहीत. या देशाची स्थिती पाहता भारत जोडो यात्रेसारखा प्रयत्न प्रशंसनीय आहे’ असे स्वराने म्हटले होते. यापूर्वी तेलंगणात मोहम्मद अझरुद्दीन तसेच दाक्षिणात्य अभिनेत्री पूनम कौर यांनी यात्रेत भाग घेतला होता.

Related Stories

‘गंगा विलास’च्या पर्यटन सफरीला प्रारंभ

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्वाचे करार

Patil_p

कोलकाता : सीपीआयचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचे निधन

Tousif Mujawar

कोल्हापूरचा अनिकेत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी करारबद्ध

Abhijeet Khandekar

गोव्याचा असाही एक विक्रम!

Patil_p

राम देव नव्हते, ते रामायणातील एक पात्र…

datta jadhav