सनी देओलचा पुत्र राजवीरसोबत चित्रपट
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों यांची मुलगी पलोमा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलोमाच्या पहिल्या चित्रपटात तिचा नायक म्हणून सनी देओलाचा मुलगा राजवीर झळकणार आहे. पलोमा स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात राजश्री प्रॉडक्शनसोबत करणार आहे.
पलोमा आणि राजीव यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मिती प्रतिष्ठित चित्रपटनिर्माते सूरज बडजात्या यांचे पुत्र अवनीश करणार आहेत. अवनीश यांचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. परंतु हा राजश्रीचा 59 वा चित्रपट असणार आहे. जुलै महिन्यात याचे चित्रिकरण मुंबईत सुरू होणार आहे. पलोमा एक उत्तम कलाकार असून ती चित्रपटातील पात्राकरता अत्यंत योग्य आहे. पलोमा आणि राजवीर दोघेही स्वतःच्या भूमिकांमध्ये मिसळून गेले असल्याचे उद्गार अवनीश यांनी काढले आहेत. राजश्री प्रॉडक्शनची पसंतीची अभिनेत्री माधुरी दीक्षितने पूनम ढिल्लोंच्या मुलीला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पूनम यांनी चित्रपट निर्माते अशोक ठकेरिया यांच्याशी विवाह केला होता. या दांपत्याला पलोमा आणि अनमोल अशी दोन अपत्य आहेत.