“Poornbram” competition of three states at Kudal from tomorrow
खाद्य संस्कृतीतून कोंकणातील विद्यार्थांचे कौशल्य सर्वत्र जावे जागतिक पातळीवरच्या स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांना मिळावी यासाठीच 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत पिंगुळी – हिलस्ट्रीट येथील चिकित्सक समूहाच्या सॅटेलाईट सेंटर येथे “पूर्णब्रम्ह” महाराष्ट्र ,गोवा कर्नाटक राज्य मर्यादित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ कॉलेज तसेच कोल्हापूर, रत्नागिरी ,चिपळूण, लांजा, कारवार व गोवा राज्यातील नामांकित कॉलेजमधील 100 ते 150 विदयार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेजचे हॉस्पिलिटी विभागाचे समन्वयक अमित गावडे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज गोरेगाव मुंबई आणि सॅटेलाइट सेंटर ( कुडाळ – पिंगुळी ) यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी हॉटेल क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यानीं सांगितले. सॅटेलाइट सेंटरचे अकॅडमी हेड विवेक शेट्टी ,मुंबई सेंटर चे हेड शेफ अमोल राऊळ व मुंबई समन्वयक नोएल फर्नाडिस ,शेफ भावेश म्हापणकर ,शशांक आंग्रे व प्रा.दत्तप्रसाद पवार आदी उपस्थित होते. चांगली कामगिरी करणाऱ्या कॉलेजला उत्कृष्ट कॉलेज म्हणून आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे
फक्त हॉटेल व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी मॉकटेल, नॅपकिन फोल्ड मास्टर माईंड ऑफ सिंधुदुर्ग ,मास्टर शेफ सिंधुदुर्ग , टॉवेल आर्ट,केक बॉस, इंस्टा रील किंग , कल्चर ऑन प्लेट, बेक माय डे आणि चेस द क्वीन अशा 10 स्पर्धा,तर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इमरजिंग शेफ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कुडाळ / प्रतिनिधी