नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रिय स्वयंवसेवक संघाच्या कार्यक्रमात देशातील लोकसंख्या नियंत्रणावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले होते. लोकसंख्या नियंत्रणासाठी नविन धोरण आणण्याच्या संकल्पनेवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण हे राजकिय हेतूने प्रेरित असल्यचा आरोप अधिररंजन चौधरी यांनी केला.
पश्चिम बंगालच्या बेहरामपूर मतदारसंघाचे खासदार असलेले अधिररंजन चौधरी म्हणाले की, “लोकसंख्या नियंत्रण धोरण आणने याच्या मागे एक प्रकारचे राजकारण आहे. भारत सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, लोकसंख्या कमी होत आहे. प्रजनन क्षमता कमी होत आहे. हे काँग्रेस हे सांगत नाही तर भारत सरकारची आकडेवारी सांगत आहे.”
नागपुरातील रेशीमबाग येथे आरएसएसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भारताला सर्व समुदायांना समानतेने लागू असणार्या सर्वसमावेशक लोकसंख्येच्या धोरणाची गरज असल्याचे सांगितले. धर्माधारित “असमतोल लोकसंख्या” दुर्लक्षित केले जाऊ नये असेही त्यांनी म्हटले होते.

