ऍमस्टरडॅमः
युरोपमधील ऑटो क्षेत्रात फोक्सवॅगनचा दबदबा कमी झाला असून तेथे पोर्श्चे आता सर्वात मूल्यवान कंपनी ठरली आहे. सदरच्या ऑटो कंपनीच्या बाजुने बातमी येताच तेथील शेअर बाजारात पोर्श्चेचे समभाग मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आल्याचे कळते.
दुसऱया स्थानी घसरलेल्या फोक्सवॅगनचे मूल्य 77 अब्ज युरोचे राहिले असून तिसऱया स्थानी 57 अब्ज युरोसह मर्सीडिझ-बेंझ राहिली आहे. यापाठोपाठ मग बीएमडब्ल्यू व स्टेलांटीस यांचा नंबर लागतो.