ः उरुग्वेवर 2 गोलनी मात, ब्रुनो फर्नांडिसचे दोन गोल, बाद फेरी गाठणारा तिसरा संघ
वृत्तसंस्था/ लुसैल-कतार
मिडफिल्डर ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या दोन गोलांच्या बळावर पोर्तुगालने उरुग्वेचा 2-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘नॉकआऊट’ फेरीत प्रवेश मिळविला. ‘एच’ गटातील हा लीग सामना कतारच्या लुसैल स्टेडियमवर खेळविण्यात आला.
फ्रान्स आणि ब्राझील यांच्यानंतर शेवटच्या 16 संघांत प्रवेश घेणारा पोर्तुगाल हा स्पर्धेतील तिसरा संघ ठरला आहे. पोर्तुगालने या सामन्यातील दोन्ही गोल दुसऱया सत्रात केले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गटातील दोन सामने खेळल्यानंतर तीन संघांनी आपला ‘नॉकआऊट’मधील प्रवेश नक्की केला असून उर्वरीत 13 जागांसाठी अजुनही 27 संघ झुंजत आहेत. कॅनडा आणि यजमान कतार हे दोन संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत.
सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपल्यानंतर 56 व्या मिनिटाला बुनो फर्नांडिसने पोर्तुगालचा आघाडीचा गोल केला. हा गोल क्रि†िस्टयानो रोनाल्डाने केला असे वाटत होते. ब्रुनो फर्नांडिसने डाव्या बाजूने मारलेला फटका रोनाल्डोने हेडरद्वारे गोलमध्ये टाकण्याचा यत्न केला. मात्र ब्रुनोचा फटका रोनाल्डोला स्पर्श न करता गोलमध्ये गेला होता. त्यानंतर स्टॉपेज टाईममध्ये मिळालेल्या पेनल्टीवर बुनो फर्नांडिसने पोर्तुगालचा दुसरा गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
पोर्तुगालचे सलग दोन विजयाने सहा गुण झाले. आता शुक्रवारी याच गटातून बाद फेरी गाठणारा दुसरा संघ ठरणार आहे. यादिवशी उरुग्वेचा सामना तीन गुणानी दुसऱया स्थानावर असलेल्या घानाशी होईल आणि पोर्तुगालची लढत घानाला विजयासाठी झुंजविणाऱया कोरिया प्रजासत्ताकशी होईल.
सुमारे 89,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळविण्यात आलेल्या लढतीत दोन्ही संघांनी आपल्या आक्रमक खेळींनी फुटबॉलप्रेमीना रिझविले. या सामन्यात पोर्तुगालने आपला व्हेटरन फुटबॉलपटू पेपे (39 वर्षे) याला खेळविले. विश्वचषकात खेळणारा तो दुसरा वयस्कर खेळाडू बनला आहे. सरावावेळी डॅनिलो परेरा हा जखमी झाल्याने त्याच्या स्थानावर पेपेला स्थान मिळाले. कॅमेरूनचा रॉजेर मिला हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याने 1994 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला त्यावेळी तो 42 वर्षांचा होता.
पोर्तुगालने सामन्याचे पहिले सत्र गाजविले व उरुग्वेच्या दोन्ही बाजूनी कित्येक चालीही रचल्या. मात्र, उरुग्वेचा गोलरक्षक सर्जिओ रॉचेटला ते जास्त दबावावर ठेऊ शकले नाहीत. उरुग्वेच्या एडीनसन कवानी व डार्वीन न्यूनीज यांनी काही धोकादायक आक्रमणे प्रतिस्पर्धी पोर्तुगालवर केली. अशाच एक चालीवर उरुग्वेच्या रॉड्रिगो बेंतानकूरचा गोल करण्याचा यत्न प्रतिस्पर्धी गोलरक्षक दियोगो कॉस्ताने ब्लॉक करून उधळून लावला.
पहिल्या सत्रात पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर क्रि†िस्टयानो रोनाल्डो आपला विशेष प्रभाव पाडू शकला नाही. दुसऱया सत्रात आरंभालाच रोनाल्डोने दिलेल्या पासवर विलियम कार्वाल्होने हाणलेली व्हॉली क्रॉसबारवरून गेली. त्यानंतर लगेच ब्रुनो फर्नांडिसने पोर्तुगालच्या पहिल्या गोलाची नोंद केली. रोनाल्डोच्या नावावर नोंद झालेला हा गोल नंतर ब्रुनोच्या नावावर नोंद करण्यात आला. या गोलची नोंद रोनाल्डोच्या नावावर झाली असती तर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 9 गोलांची नोंद असलेल्या पोर्तुगाली ग्रेट युझेबियोच्या गोलांशी त्याची बरोबरी झाली असती.
यानंतर उरुग्वेचे प्रशिक्षक डायगो ओलोंसोने आघाडीफळीत अधिक आक्रमकता आणण्यासाठी आपले अनुभवी स्ट्रायकर्स मॅक्सी गोमीझ व लुईस सुवारेझ यांना संधी दिली. यांच्या समावेशाने उरुग्वेच्या आघाडीफळीत आणि खेळातही आक्रमकता आली. या दरम्यान या दोघांचेही अगदी जवळून गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. प्रथम गोमेझचा 20 यार्डवरून हाणलेला शक्तीशाली फटका गोलच्या खांब्याला आदळून परत खेळात आला तर सुवारेझचा फटका ‘साईड नेटिंग’ला लागला.
90 मिनिटांचा खेळ जवळजवळ संपला असताना पोर्तुगालला पेनल्टी फटका बहाल झाला. बुनो फर्नांडिसचा फटका गिमिनेझ यांने हँडल केल्यानंतर ‘व्हीएआर’ चेकमध्ये पाहिल्यानंतर इराणचे रेफ्री अलिरेझा फघानी यांनी पोर्तुगालला पेनल्टी बहाल केली. यावर ब्रुनो फर्नांडिसने संघाचा व आपला दुसरा गोल केला. शेवटच्या क्षणी ब्रुनोला आपला तिसरा गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याचा तो 20 यार्डवरून मारलेला फटका गोलपोस्टला लागून परत आल्याने त्याची हॅट्ट्रिक नोंदविण्याची संधी मात्र हुकली.
आजचे सामने
1) ऑस्ट्रेलिया वि. डेन्मार्क
वेळ ः रात्री 8.30 वा.
2) टय़ुनिशिया वि. फ्रान्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
3) अर्जेन्टिना वि. पोलंड
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.
4) मेक्सिको वि. सौरी अरेबिया
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.