प्रतिनिधी /बेळगाव
पोस्ट विभागाचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात बेळगाव येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमननी आंदोलन केले. पोस्ट विभागाचे खासगीकरण झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. खासगीकरणाबरोबरच इतर मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केले.
पोस्ट विभागाचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे कार्यरत असणाऱया कर्मचाऱयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱयांकडून खासगीकरणाच्या धोरणाला विरोध होत आहे. याचबरोबर लागू करण्यात आलेली नवीन पेन्शन योजना बंद करून जुनीच पेन्शन राबवावी, अशी मागणी कर्मचाऱयांनी केली. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर देशपांडे, तळवार, रवी पाटील, एम. ओ. कांबळे, एस. आर. पाटील, एम. एन. तिगडी, ए. एम. डब्बू, सी. ए. कन्नूर, कुमार बेळगावकर यांसह इतर सदस्य उपस्थित होते.