Tarun Bharat

विविध मागण्यांसाठी पोस्टमनची निदर्शने

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी पोस्ट कर्मचाऱयांनी बुधवारी एक दिवसाचा संप पुकारून निदर्शने केली. बेळगाव विभागातील 40 हून अधिक आरएमएस व पोस्टमन यांनी या संपामध्ये भाग घेतला. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या परिसरात कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली.

  केंद्र सरकारकडून पोस्ट विभागाचे खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पोस्ट कर्मचारी बेरोजगार होणार असल्याने आतापासूनच कर्मचाऱयांनी विरोध सुरू केला आहे. बुधवारी पोस्ट कर्मचाऱयांनी देशव्यापी संप पुकारला होता. या संपामध्ये बेळगाव शहरातील पोस्टमन सहभागी झाले होते. खासगीकरण केल्यास सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोस्ट कर्मचाऱयांनी दिला आहे.

 मंगळवारी मोहरमनिमित्त पोस्ट कार्यालयांना सुटी होती तर बुधवारी पोस्टमन संपावर होते. या सर्व कारणांमुळे राखी पोहोचण्यास विलंब झाला आहे. गुरुवारी रक्षाबंधन असल्यामुळे अनेक भाऊ आपल्या बहिणीच्या राखीची वाट पहात आहेत. सुटी व संपामुळे राखी पोहोचण्यास विलंब होणार आहे.

Related Stories

बळ्ळारी नाल्याच्या खोदाईकामाला आताच सुरुवात करा

Amit Kulkarni

बेळगावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते होदेगिरीला रवाना

Amit Kulkarni

हिडकल पाणी पुरवठा विस्तारीकरणाचे काम रखडले

Patil_p

अक्रम-सक्रम योजनेंतर्गत घरांना मंजुरी द्या

Amit Kulkarni

विकेंड लॉकडाऊननंतर पुन्हा खरेदीसाठी झुंबड

Amit Kulkarni

विरापुरात जिल्हाधिकाऱयांचे ग्रामवास्तव्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!