Tarun Bharat

खड्डे बुजविले, निम्म्या खड्डय़ांकडे दुर्लक्ष

बॉक्साईट रोड सह्याद्रीनगर परिसरातील रस्त्यावरील खड्डय़ांची दुरुस्ती अर्धवटच

प्रतिनिधी/ बेळगाव

बॉक्साईट रोड सह्याद्रीनगर परिसरातील रस्त्यावरील खड्डय़ांची दुरूस्ती करण्यात येत आहे. मात्र विद्यानगर बसथांब्याजवळील काही खड्डे बुजविण्यात आले तर निम्मे खड्डे बुजविण्यात आले नसल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अर्धवट काम करण्यामागचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

बॉक्साईट रोडची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून काही ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने या रस्त्याची देखभाल केली जाते. पण गेल्या काही महिन्यात रस्त्याची दुरवस्था होऊनदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीच कारवाई केली नाही. काही ठिकाणी रस्ता उखडला असून विद्यानगर ते सह्य़ाद्री नगरपर्यंतच्या पाचशे मीटर अंतराच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. यादरम्यान रस्ता उखडला आहे. तर उर्वरीत रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

या रस्त्यावरून कृषी उत्पन्न बाजारपेठेत भाजी घेऊन जाणाऱया वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे अवजड वाहनासह ट्रक्टर आणि अन्य वाहनांची गर्दी होत असते. परिणामी रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डय़ाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण दुरूस्तीचे काम व्यवस्थित केले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अर्धवट खड्डे बुजविण्यामागचा उद्देश काय?

 काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविले नसल्याचे निदर्शनास आले आहे. खड्डे बुजविण्याचे काम अर्धवट झाले असून खडी रस्त्यावर उखडून पडली आहे. परिणामी वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. त्यामुळे अर्धवट खड्डे बुजविण्यामागचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. या रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

जिल्हय़ातील साडेचार लाख जणांचा अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni

ऑक्सिजन सिलिंडर्स टंचाईचा तिढा कायम

Amit Kulkarni

बेळगावकरांचा दिल्ली प्रवास होणार आरामदायी

Patil_p

हाडलगा येथील जवानाचा राजस्थानमध्ये आजाराने मृत्यू

Tousif Mujawar

कोरोनाच्या आव्हानाला तरुण डॉक्टरांनी कणखरपणे सामोरे जावे!

Patil_p

15 व्या वित्तआयोग अनुदानांतर्गत 16.38 कोटी मंजूर

Amit Kulkarni