Tarun Bharat

चिंदर-भगवंतगड रस्त्यावरील खड्डे आता बुजणार

आचरा / प्रतिनिधी-

मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. चिंदर भगवंतगड रस्ताही खड्डेमय झाला होता. या रस्त्याने स्थानिक ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण झाले होते .याबाबत जेरोन फर्नांडिस यांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते यावेळी त्यांनी खड्डे बुजविण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार शुक्रवारी सामंत यांच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ग्रामस्थांची खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी माजी बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस, माजी सरपंच संतोष कोदे, उद्योजक जयप्रकाश परुळेकर हे प्रयत्नशील होते. सामंत यांनी साहित्य उपलब्ध करून दिल्यावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते याकामी लागणाऱ्या जेसीबी ची सोय जयप्रकाश परुळेकर यांनी केली होती. गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवले गेल्याने चिंदर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

बिगर रेशनकार्डकारांना मोफत तांदूळ

NIKHIL_N

समूहगीत गायन स्पर्धेत दोडामार्ग येथील सावंतवाडा प्रा. शाळेचे यश

Anuja Kudatarkar

महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून कोरोना रुग्ण वंचित

Patil_p

माडखोलचे सुपुत्र महेश आडेलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक

Anuja Kudatarkar

चंद्रकांत सावंत यांना भारत भूषण सन्मान

NIKHIL_N

रत्नागिरीच्या समुद्रात गोव्यातील 2 पर्ससीननेट नौकांवर कारवाई

Patil_p