वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती : मडकईत भूमिगत वीज वाहीन्याना प्रारंभ प्रत्येक तालुक्यात रू.40 कोटीचा निधी
वार्ताहर /मडकई
वीज खात्याचा ताबा घेतल्यानतंर खात्याचा महसूल 36 टक्यांनी वाढवून रू. 180 कोटी पर्यंत नेल्यामूळेच भूमिगत वीज वाहीन्या टाकण्याचे काम हाती घेऊ शकलो. मडकई मतदार संघाबरोबरच फेंडा तालुक्यात ही भूमिगत वीज वाहीन्या टाकून खंडीत वीजसेवेचा प्रश्न कायम निकाली लागणार आहे. फोंडा तालुक्याती प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी रूपये 40 कोटी खर्चून भूमिगत वीज वाहीन्याचे काम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
तळूले-बांदोडा येथील श्री गजानन हनुमान सभागृहात पुर्टी फोंडा येथील वीज खाते विभाग 10 तर्फे हा पायाभरणी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. मडकई मतदार संघातील भूमीगत वीज वाहिन्या उंडीर व दुर्भाट फिडर वरून रूंपातरीत करण्यात आलेल्या 11 केव्ही उच्च ताण वीज नेटवर्क पायाभरणी कामाच्या शुभारंभ सोहळय़ाला कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, विजखात्याचे सचिव व्हाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर, मुख्य विज अभियंता स्टिफन फर्नांडीस, कार्यकारी अभियंते पि. पि. भारतन, सहाय्यक अभियंते केशव गावडे, कनिष्ठ अभियंते अजय परांजपे, संचालक रोहन गर्ज आदी व्यासपिठावर उपस्थीत होते.
मडकईत हे वर्ष विकासाचे – मंत्री ढवळीकर
मडकई मतदार संघासाठी हे विकासाचे वष्x आहे. उंडीर व मडकईत मैदान, गार्डन, उंडीर व मडकईत विविध सुवीधांनी युक्त असलेले सभागृह बांधण्यात येईल. भूमिगत वाहीन्या ही कामे करताना नागरिकांना काही अडचणी आल्यास आपल्याला अथवा वीज खात्याच्या अभियंत्याकडे त्यांनी कैफियत मांडावी. गटारात सोडलल्या सांडपाण्यामूळे परिसरात अस्वच्छता पसरत आहे. म्हणूनच मलनिस्सारण प्रकल्पाची सोय करण्यात आलेली आहे. सरकारच्या माध्यामातून सर्वच कामे करता येत नाही. त्यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर सहाय्य करीत आहे.
मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडीस, सचिव व्हाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर, गणपत नाईक यानी मगोगत क्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात मंत्री सुदिन ढवळीकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत व नामफलकाचे अनावरण करून करण्यात आले. स्वागत केशव गावडे यांनी तर आभार अजर परांजप यांनी मानले.