12 डिसेंबरपर्यंत चालणार दुरुस्तीचे काम
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथील 110 के. व्ही. विद्युत केंद्रात दुरुस्ती केली जाणार असल्याने दि. 7 ते 12 डिसेंबर दरम्यान वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे उद्यमबाग परिसरात सकाळच्या सत्रात वीजपुरवठा ठप्प होणार असल्याने नागरिक व उद्योजकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.
दि. 7 ते 9 व सोमवार दि. 12 रोजी पहाटे 5.30 ते सकाळी 9.30 यावेळेत तर शनिवार दि. 10 व रविवार दि. 11 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. उद्यमबाग औद्योगिक क्षेत्र, खानापूर रोड, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरा रेल्वेगेट, वसंतविहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल परिसर, देवेंद्रनगर, महावीरनगर, जीआयटी कॉलेज परिसर, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, जैतनमाळ या परिसरात वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.