प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमकडून विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असून मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, बागलकोट रोड, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अरस कॉलनी, शेट्टी गल्ली, मुख्य बसस्थानक परिसर, चव्हाट गल्ली, कोतवाल गल्ली, खडेबाजार, काकतीवेस, कडोलकर गल्ली, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, शनिवार खूट, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, उज्ज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, मारुतीनगर, दरबार गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली यासह परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.