दोन ठार, अनेक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सोमवारी शक्तिशाली स्फोट झाला. काबूलमधील परराष्ट्र मंत्रालय मार्गावरील दौदझाई टेड सेंटरजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात अनेक सरकारी इमारती आणि दुतावास आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा स्फोट शक्तिशाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत.