Tarun Bharat

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी पी.आर पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि.,राजारामनगर (साखराळे) चे अध्यक्ष,राज्याच्या सहकारी क्षेत्रातील जेष्ठ नेते पी.आर.पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ,मुंबईच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी लोकनेते सुंदररावजी सोळंकी सहकारी साखर कारखाना,माजलगावचे अध्यक्ष,माजी मंत्री प्रकाशराव सुंदररावजी सोळंकी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप पुंजाजी ओहोळ या दोघांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या.

माजी उपमुख्यमंत्री,विरोधी पक्ष नेते ना.अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,नॅशनल फेडरेशन,दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भगतदादा पाटील, शैलजादेवी जयंत पाटील,आ.मानसिंगभाऊ नाईक,आ. मोहनराव कदम यांच्यासह असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी पी.आर पाटील व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई येथे निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई नगरीचे उपनिबंधक पी.डी.पाटील यांच्या अध्यक्षते खाली नूतन संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्व.विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब मोहनराव पाटील यांनी अध्यक्षपदासाठी पी.आर. पाटील यांचे नांव सुचविले,त्यास नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना,शहाजीनगरचे अध्यक्ष,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले. बैठकीस माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,माजी मंत्री प्रकाश आवाडे,माजी आ.नरेंद्र घुले-पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढाचे अध्यक्ष,आ.बबनराव शिंदे (दादा),संत कूर्मदास सहकारी साखर कारखाना, सोलापूर चे अध्यक्ष धनाजी साठे,छ.शाहू सहकारी साखर कारखाना,कागलच्या अध्यक्षा सुवासिनी विक्रमसिंह घाडगे,अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा रश्मीताई बागल यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Related Stories

मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा

Archana Banage

…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंचं खळबळजनक विधान

Archana Banage

’भजनी’ मंडळावर पसरली कोरोनाची गडद छाया

Patil_p

मिनिटाला एक बाधित; बेडसाठी धावाधाव

Patil_p

लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत बैठक सुरु

Archana Banage

“कसं काय शेलार बरं हाय का?”, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

Archana Banage