Tarun Bharat

अमेरिकेतील युनिव्हर्सिटीतर्फे प्रभाकर कोरे यांना डॉक्टरेट

प्रतिनिधी/ बेळगाव

अमेरिकेतील फिलाडेल्फीया येथील थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात दि. 25 मे रोजी डॉ. कोरे यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ची मानद पदवी देण्यात येईल, अशी माहिती जेफर्सन विद्यापीठाच्या ग्लोबल हेल्थचे संचालक डॉ. रिचर्ड डर्मंड यांनी दिली.

शनिवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, डॉ. कोरे यांनी केएलई संस्थेच्या प्रगतीसाठी तसेच शिक्षण, आरोग्य सेवा व संशोधन यासाठी केलेल्या अथक परिश्रमांची दखल घेऊन त्यांना ही पदवी देण्यात येत आहे. त्यांनी बेळगावसारख्या शहरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.

जेफर्सन विद्यापीठ हे नामांतिक विद्यापीठ असून दीक्षांत समारंभावेळी थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीतील इंडिया सेंटर फॉर स्टडीजचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अमेरिकेतील भारताचे राजदूत कौन्सिल जनरल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. काहेर विद्यापीठ जेफर्सनशी सलग्न असून माता व नवजात शिशूंच्या आरोग्यासंदर्भात जागतिक दर्जाचे संशोधन सुरू आहे, असेही डॉ. डर्मंड यांनी सांगितले. याप्रसंगी रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. शिवप्रसाद गौडर, काहेरचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, डॉ. व्ही. ए. कोठीवाले उपस्थित होते.    

Related Stories

संगीता मोरे यांना बी.एससी. मध्ये सुवर्णपदक

Patil_p

विद्युत मीटर रीडिंगच्या तारखेत बदल

Amit Kulkarni

विजापुरात आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

mithun mane

विद्युत पुरवठ्यासाठी बेकवाड भागातील शेतकऱ्यांचा हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये आता कोविड विभाग

Patil_p

कपिलेश्वर उड्डाणपुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

Amit Kulkarni