Tarun Bharat

बेंगळूर एफसी बरोबर प्रबिर दास करारबद्ध

वृत्तसंस्था/ बेंगळूर

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी बेंगळूर एफसी संघाने एटीके मोहन बागान संघातील फुटबॉलपटू प्रबिर दास बरोबर नवा करार केला आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या पुढील हंगामात दास बेंगळूर एफसीचे प्रतिनिधीत्व करेल.

प्रबिर दासने आपल्या फुटबॉल कारकीर्दीला इंडियन ऍरोज क्लबकडून प्रारंभ केला. काही दिवसानंतर त्याचा गोव्याच्या धेंपो संघात समावेश झाला होता. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या हंगामात प्रबिर दासने एफसी गोवा संघाचे तर त्यानंतर दिल्ली डायनामोज क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते. 2016 नंतर दास कोलकाताच्या एटीके-मोहन बागान क्लबकडून खेळू लागला. गेल्या दोन इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात प्रबिर दासने एटीके-बागान संघाकडून 39 सामन्यांत सहभाग दर्शविला होता.

Related Stories

पाक-बांगलादेश टी-20 सामना रद्द

Patil_p

आजाराला कंटाळून कोल्हापूरच्या कबड्डी पट्टू युवतीची आत्महत्या

Abhijeet Khandekar

न्यूझीलंडचा विंडीजवर 50 धावांनी विजय

Patil_p

वनडे मालिकेतून मॅट हेन्री बाहेर

Patil_p

इंग्लंड, स्पेन, वेल्ससह भारत ड गटात

Amit Kulkarni

विराट सेनेचा नववर्षात सलग दुसरा मालिका विजय; ऑस्ट्रेलियावर मात

Archana Banage
error: Content is protected !!