प्रतिनिधी / बेळगाव
मराठा मंदिर येथे बुधवार दि. 19 रोजी ‘ज्ञान की लायब्ररी’चे प्रवर्तक प्रदीप लोखंडे यांचे व्याख्यान सायंकाळी 5 वाजता मराठा मंदिर येथे होणार आहे. व्याख्यान सर्वांना खुले आहे. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे….
लोखंडे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार संधीची दिशा देण्यासाठी 2000 साली रुरल रिलेशन नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि गोवा अशा नऊ राज्यात 49 हजारहून अधिक गावांचे नेटवर्क तयार केले.
सातारा जिह्यातील वाई तालुक्मयामधील एका छोटय़ाशा खेडय़ात जन्मलेल्या प्रदीप लोखंडे यांनी नोकरी करत करत कॉमर्स पदवी मिळविली. त्यानंतर मार्केटिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश मिळविला. ग्रामीण भागातील या तरुणाचा मार्केटिंगमध्ये कसा टिकाव लागणार असे वाटल्याने त्यांना पिटाळून लावण्यात आले. मात्र, जिद्द न सोडता त्यांनी मध्य प्रदेशात जाऊन जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत नोकरी मिळविली. हे करत असतानाच त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांसाठी ’रुरल रिलेशन’ ही संस्था सुरू केली आणि ग्रामीण भागात सुमारे 20,000 शाळांना 28,000 कॉम्प्युटर मिळवून दिले.
मराठी भाषा टिकून राहिली पाहिजे यासाठी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता त्यांनी ’ज्ञान की लायब्ररी’ सुरू केली. मॅनेजमेंटचे औपचारिक शिक्षणही न घेतलेल्या लोखंडे यांना ख्यातनाम मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते, हेच त्यांच्या जिद्दीचे यश असून अशा तज्ञांचे मार्गदर्शन बेळगाव भागातील तरुणांना मिळणार आहे. बेळगावकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.