Tarun Bharat

देशात राजेशाहीला नव्याने सुरवात ; प्रकाश आंबेडकरांची टीका

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या पंतप्रधानांचा वाढदिवस राजासारखा साजरा करावा असे सत्ताधाऱ्यांना वाटू लागले आहे. तर भारतात चित्ते कधी आणावेत याचा दिवस देखील राजाच्या वाढदिवसा दिवशी निवडला जातो. त्यावरूनच देशात राजेशाहीला सुरुवात झाली आहे. असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना लगावला आहे आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्पावरून शेलारांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आशिष शेलार यांचे १० टक्के हे वक्तव्य हे जर सत्य असेल तर महाविकास आघाडीवरील लोकांचा विश्वास उडेल. त्यामुळे सत्य काय आहे समोर यायला हवं, असे ते म्हणाले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोयाबीन सह पावसाळी पिकांचे मोठ्या रामनाथ नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर ७० ते ८० टक्के नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेले ८ चित्ते कुनो अभयारण्यात मोदींच्या हस्ते सोडण्यात आले. देशात असा एक कार्यक्रम राहिला नाही ज्याचा मोदींनी इव्हेन्ट केला नाही. काल देशात चित्ते आणले त्याचा देखील इव्हेट पंतप्रधान मोदींनी केला, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. तसेच देशात माणसापेक्षा प्राण्याला महत्व आलं आहे. त्यामुळं माणसांनी माणसांनी याचा विचार करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ४० आमदारांना घेऊन भाजप बरोबर युती करत सरकार स्थापन केलं. राज्यात आगामी निवडणूकही शिंदे गट- भाजप एकत्र लढणार आहे. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोडलं तर आम्ही त्यांच्यासोबत जावू. तसेच जे जे बीजेपी सोबत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करणार का असं विचारलं असता काँग्रेस युतीला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत युती करू. ठाकरेंची शिवसेना युतीसाठी तयार असेल आम्ही त्यांच्यासोबतही युती करायला तयार आहोत, पण दुर्दैवाने याची बोलणी होत नाही, असे म्हणत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्ते आलं. त्यांनतर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला असला तरी अजून जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही. यावर विरोधक टीका करत आहे. पण मुख्यमंत्री सर्व घोषणा करत असताना जिल्ह्याला पालकमंत्री कशाला हवा असे, आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस शनिवारी झाला. यावरून प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला. देशात राजाचा वाढदिवस लोकांनी साजरा केला पाहिजे असे वाटू लागले आहे. देशात राजेशाहीला नव्याने सुरवात झाली आहे. देशात चित्ते कोणत्या दिवशी आणले, तेही पंतप्रधानांच्या वाढदिवसादिवशी, यावरूनच राजेशाहीला सुरवात झाली असे म्हणता येईल, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

Related Stories

नागालँडमध्ये कुत्र्याच्या मांस खरेदी-विक्रीस बंदी

datta jadhav

खोक्यांवरून चिडवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे काय?- दिपक केसरकर

Abhijeet Khandekar

रेल्वेच्या खाजगीकरण विरोधाच्या आंदोलनात सिटूच्या १३८ कार्यकर्ते ताब्यात

Archana Banage

कृष्णा सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळ्यास प्रारंभ

Patil_p

आम्ही शिवसेनेसोबत राहू पण…! एकनाथ शिंदे यांचे ‘तीन’ प्रस्ताव थेट वर्षावर

Archana Banage

आषाढीला संतांच्या पादुका एसटीबस व हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार

Archana Banage