Prakash Ambedkar : दसऱ्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होत एकमेकांवर टिकेची तोफ डागळत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार आंबेडकरांनी शुक्रवारी केला. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते जालना इथं आले होते. काल ते जालण्यात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव स्वीकारणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाहीय. त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकांसाठी आम्ही आमची तयारी करीत आहोत. राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.युतीसाठी आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना आणि काँग्रेसकडं निरोप पाठविला असून आता काय करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


previous post