Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था दारुड्या सारखी – प्रकाश आंबेडकर

आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

सांगली : आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद अद्याप आला नाही. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता. तसेच दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्थाही त्या दारुड्या सारखी झाली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशात राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतर सोडली होती. मात्र मोदींनी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवला जात आहे, अस सांगून आंबेडकर पुढे म्हणाले, भारत तुटला कुठं आहे की त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे, आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरी कडेच चाललं आहे.

श्रीमंत मराठ्यांनी गरीबी मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी सर्व प्रयत्न केले. श्रीमंत मराठ्या बरोबर गरीब मराठ्यांची यापुढे युती फार काळ चालणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे.

राष्ट्रवादीकडे घड्याळ नसेल तर त्यांचं ८० टक्के मतदान भाजपला जात. तसेच काँग्रेस बाबत आहे. काँगेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले की भाजपला फायदा होतो, आणि वेगळे लढले ही भाजपला फटका बसतो.

वेदांता प्रोजेक्ट बाबत बोलताना ते म्हणाले, गुजरात आणि त्या कंपनीमध्ये करार झाला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत प्रोजेक्ट परत येणार नाही. असं सांगून आंबेडकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फसवणूक बंद करावी आणि आरक्षणा बाबत ठोस निर्णय घ्यावा.

Related Stories

पुण्यातील सोन्याचांदीच्या चोरीचे सांगली कनेक्शन

datta jadhav

सांगली जिल्ह्यात लवकरच `रेसिडयू ‘संशोधन केंद्र

Archana Banage

सांगली : जाधवनगर येथे धारदार शस्त्राने वार करत दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

Archana Banage

सांगली : शिराळा तहसील कार्यालयात एक महिन्यासाठी फेरफार नोंदणी कक्षाची स्थापना

Archana Banage

सांगली मार्केट यार्डात ११० कोटींची उलाढाल ठप्प!

Archana Banage

सांगली : नाटोली येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage