काँग्रेसने खा. प्रमोद तिवारी (Pramod Tiwari) यांची राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी तर रजनी पाटील (Rajni Patil) यांची वरिष्ठ सभागृहात व्हीप म्हणून नियुक्ती केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी ट्विटरवरून या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.
2022 पर्यंत या पदावर असलेले आनंद शर्मा यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले पद भरण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी तीन वेळा राज्यसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री असलेले प्रमोद तिवारी यांची निवड केली. 2013 पासून प्रमोद तिवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
दोन वेळा खासदार असलेल्या रजनी पाटील या मे महिन्यात राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत निवडूण आल्या आहेत. असंसदीय वर्तनासाठी संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्यावर कॉंग्रेसने व्हिपची जबाबदारी सोपवली आहे. खासदार रजनी पाटील यापूर्वी 11 व्या लोकसभेत बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.