Tarun Bharat

चेन्नईचा प्रणव भारताचा 75 वा ग्रँडमास्टर

Advertisements

वृत्तसंस्था/ चेन्नई

चेन्नईचा 15 वर्षीय बुद्धिबळपटू व्ही. प्रणव हा भारताचा 75 वा ग्रँडमास्टर बनला आहे. रुमानियामध्ये अलिकडेच झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रणवने विजेतेपद पटकाविले.

प्रणवने यापूर्वी दोनवेळा ग्रँडमास्टर नॉर्म मिळविला होता. रुमानियातील झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने 9 फेऱयांमध्ये 7 गुण घेत विजेतेपद पटकाविताना तिसरा आणि शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून ग्रँडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब केला. 2021 साली सर्बिया येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रणवने पहिला ग्रँडमास्टर नॉर्म तर त्यानंतर गेल्या जूनमध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत दुसरा ग्रँडमास्टर नॉर्म पटकाविला होता. तामिळनाडुतून प्रणव हा 27 वा ग्रँडमास्टर आहे. विश्वनाथन आनंद, डी. गुकेश, आर. प्रग्यानंद हे तामिळनाडूचेच ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहेत. 15 वर्षीय प्रणवने नुकतेच आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Related Stories

सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, जयंत यादव इंग्लंडला जाणार

Patil_p

बडे खेळाडू युवा विश्वचषकातच घडतात

Patil_p

खलिल अहमदचे टी-20 मध्ये बळींचे शतक

Patil_p

‘खेलो इंडिया’ स्पर्धेत योगासनाचा समावेश

Amit Kulkarni

पंजाबकडून हॉकीपटूंसाठी बक्षिसांची घोषणा

Patil_p

पठाण बंधूंकडून वडोदरा पोलिसांना व्हिटॅमिन-सी गोळय़ांचे बॉक्स

Patil_p
error: Content is protected !!