नवी दिल्ली : दुबईमध्ये 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया आशिया बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत भारताची भिस्त प्रामुख्याने एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर राहील.
या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने संघ निवड करताना निवड चाचणी घेतली पण प्रणॉय आणि सिंधू यांची या स्पर्धेसाठी थेट निवड केली. 2021 साली ही स्पर्धा यापूर्वी भरविण्याचे ठरविले होते. पण कोरोना महामारीमुळे ती रद्द करण्यात आली होती. यावेळी पुरुष एकेरीत सेनच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहील. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि आकषी काश्यप भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीने दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. दुबईमध्ये होणाऱया स्पर्धेत कृष्णप्रसाद आणि विष्णूवर्धन गौड ही भारताची दुसरी जोडी पुरुष दुहेरीत खेळणार आहे. महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि टेसा जॉली त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत इशान भटनागर व तनिषा कॅस्ट्रो भारताचे प्रतिनिधित्व करतील.