Tarun Bharat

बॅडमिंटन मानांकनात प्रणॉय 15 व्या स्थानी

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा एच. एस. प्रणॉय याने जवळपास चार वर्षानंतर पहिल्यांदा पहिल्या 15 बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. या मानांकन यादीत प्रणॉय सध्या 15 व्या स्थानावर आहे.

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरुष एकेरी बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत एच. एस. प्रणॉयने यापूर्वी म्हणजे 17 ऑक्टोबर 2018 साली 15 वे स्थान मिळविले होते. प्रणॉयने पुन्हा हे स्थान यावेळी मिळविले आहे. पुरुष दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी 23 वे स्थान पटकाविले आहे. त्यांचे स्थान तीन अंकांनी वधारले आहे. मिश्र दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या इशान भटनागर आणि तनिषा भटनागर यांनी 30 वे स्थान मिळविले आहे. अलीकडेच नागपूरमध्ये झालेल्या महामेट्रो महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव कपिला आणि एम. आर. अर्जुन यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर मानांकनमध्ये पुरुष एकेरीच्या मानांकनात अलीकडेच एच. एस. प्रणॉयने 6 सप्टेंबर रोजी अग्रस्थान पटकाविले होते. विश्व टूर मानांकनात प्रणॉय हा अव्वल क्रमांकाचा बॅडमिंटनपटू ठरला होता.

2022 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरला 11 जानेवारीपासून प्रारंभ झाला असून 18 डिसेंबरला संपणार आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या या पाचव्या विश्व टूर हंगामात एकूण 22 स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून अंतिम स्पर्धा डिसेंबरला होणार आहे. विश्व टूरमधील 22 स्पर्धा पाच विविध स्तरावर विभागण्यात आले आहेत. त्यानुसार लेव्हल वन विश्व टूर फायनल, लेव्हल टू सुपर 1000, लेव्हल थ्री सुपर 750, लेव्हल फोर सुपर 500 आणि लेव्हल फाईव्ह सुपर 300 अशा दर्जाच्या या स्पर्धा असून या स्पर्धांसाठी विविध मानांकन गुण तसेच विविध बक्षीसाची रक्कम ठेवण्यात आली आहे. एच. एस. प्रणॉयने 2022 च्या बॅडमिंटन हंगामाला बऱयापैकी प्रारंभ करताना जानेवारीत झालेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तसेच जानेवारीत झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत त्याने शेवटच्या 8 खेळाडूत प्रवेश केला होता. 2022 च्या मार्चमध्ये झालेल्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर मार्चमध्ये झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्याला पहिली फेरी पार करता आली नाही. स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपविजेपद मिळविले. कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याचप्रमाणे मे महिन्यातील थायलंड खुल्या स्पर्धेत त्याला पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. जूनमधील इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्या जुलै महिन्यात झालेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले होते. जुलै महिन्यातील सिंगापूर खुल्या स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरी तसेच ऑगस्ट महिन्यातील जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले होते.

Related Stories

यंदा विक्रमी धान्योत्पादनाचा अंदाज

Amit Kulkarni

चाचण्या वाढवण्याचे 13 राज्यांना निर्देश

Amit Kulkarni

शेतकऱयांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतुद

prashant_c

…तर मोदी सरकार तुम्हाला देईल पाच हजारांचे बक्षीस

datta jadhav

‘गुजरातची जनता तुम्हाला धडा शिकवेल’;स्मृती इराणी अरविंद केजरीवाल यांच्यावर भडकल्या

Archana Banage

स्टर्लाईट प्रकल्पाला इस्त्रो पथकाची भेट

Patil_p
error: Content is protected !!