Tarun Bharat

प्रणॉय, समीर वर्मा पराभूत

वृत्तसंस्था/ पॅरीस

प्रेंच खुल्या सुपर 750 पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा यांचे आव्हान पुरुष एकेरीच्या प्रकारात संपुष्टात आले.

चीनच्या लु झुने एच एस प्रणॉयचा 21-19, 20-22, 21-19 असा पराभव केला. तर दुसऱया एका सामन्यात थायलंडच्या के. विटीडसमने समीर वर्मावर 21-18, 21-18 अशी मात केली. प्रणॉय आणि समीर वर्मा यांचे आव्हान पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या गिमेकीने के. श्रीकांतचा 19-21, 21-12, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला होता. हा सामना सुमारे 80 मिनिटे चालला होता. आता या स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांचे दुहेरीतील आव्हान अद्याप जिवंत आहे. पुरुष दुहेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी मलेशियाच्या चाँग आणि काइ वू ती यांचा 21-16, 21-14 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

लॉकी फर्ग्युसनने केले विजयाचे ‘लॉकिंग’!

Patil_p

सध्याच्या घडीला विराटच सर्वोत्तम : इयान चॅपेल

Patil_p

विम्बल्डनमध्ये जोकोविच, स्वायटेकला अग्रमानांकन

Patil_p

हरियाणा स्टीलर्सची बंगाल वॉरियर्सवर मात

Patil_p

पाकचे आणखी तीन क्रिकेटपटू कोरोनाबाधित

Patil_p

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, आकर्षी कश्यप उपांत्य फेरीत

Patil_p