वृत्तसंस्था/ कौलालंपूर
2023 च्या बॅडमिंटन हंगामाला येथे मलेशिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेने प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या एच. एस. प्रणॉयचे पुरुष एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. जपानच्या सातव्या मानांकित कोडाई नाराओकाने प्रणॉयचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानचा सातवा मानांकित तसेच 21 वषीय नाराओकाने एच. एस. प्रणॉयचा 84 मिनिटांच्या कालावधीत 21-16, 19-21, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. नाराओकाचा प्रणॉयवरील हा तिसरा विजय आहे. उभयतांमध्ये यापूर्वी दोनवेळा सामने झाले होते आणि त्यात प्रणॉयला हार पत्करावी लागली होती. शुक्रवारच्या सामन्यात नाराओकाने पहिला गेम जिंकल्यानंतर प्रणॉयने आपल्या स्मॅश फटक्मयांवर नियंत्रण ठेवत दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱया आणि निर्णायक गेममध्ये नाराओकाने प्रणॉयला वारंवार नेटजवळ खेचत चांगलेच दमविले. दमछाक झाल्याने प्रणॉयचे फटके चुकीच्या पद्धतीने नोंदविले गेल्याने नाराओकाने आपला विजय नोंदविला. जपानच्या नाराओकाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी द्वितीय मानांकित लि जियाचा तसेच यंगचा पराभव केला होता. प्रणॉयकडून नाराओकाला 12 मॅच पॉईंट्स बहाल करण्यात आले.