Tarun Bharat

प्रसन्ना सुंठणकर जिमखाना सचिव

Advertisements

सुहास कुलकर्णी यांची संचालकपदी निवड

बेळगाव : कॅम्प येथील युनियन जिमखाना लि.ची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. प्रसन्ना सुंठणकर यांची सचिवपदी तर सुहास कुलकर्णी यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

युनियन जिमखाना येथे झालेल्या 86 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रारंभी जिमखानाचे दिवंगत सभासद सुशिल दंडी, रमेश शिंदे, बसवराज पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.

यावेळी प्रसन्ना सुंठणकर व सुहास कुलकर्णी यांचा अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व उपाध्यक्ष संजय पोतदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. संचालक सुधाकर पाटणकर, संजय मोरे, संजय चव्हाण आदि याप्रसंगी उपस्थित होते. संजय पोतदार यांनी आभार मानले.

Related Stories

शनिवारी वकील-कुटुंबीयांना देण्यात आली लस

Patil_p

रस्त्यावरील विद्युतखांब हटविण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

खानापूर : मास्क-सामाजिक अंतर-लसीकरणावर भर द्या

Amit Kulkarni

नियमांचे पालन न केल्यास कामे करू नका

Patil_p

जागा दाखवा, लवकरच ग्राहक आयुक्त फोरम स्थापन करू

Amit Kulkarni

मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये बाबुराव ठाकुर जयंती

Patil_p
error: Content is protected !!