ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी कॉंग्रेसच्या एका समितीचे सदस्य म्हणून पक्षात सामील होण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव नाकारली. यासंदर्भाची माहीती रणदीप सुरजेवाला यांनी दिल्यानंतर प्रशांत किशोर यांची बाजू समोर आली असून त्यांनी कॉंग्रेसला सल्ला दिल्याचे दिसून येते.
“ईएजी म्हणजेच सक्षम कृती गटाचा भाग म्हणून पक्षात सामील होण्याची तसेच निवडणुकीची विशेष जबाबदारी घेण्याची काँग्रेसची ऑफर मी नाकारली,” असे प्रशांत किशोर यांनी ट्विटरवर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. पुढे लिहताना ते म्हणतात “माझ्या मतानुसार, माझ्यापेक्षा पक्षाला खरी गरज ही परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करणे असून त्यासाठी नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे,” असे ते म्हणाले.
“काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्याशी सादरीकरण आणि चर्चेनंतर, एक सक्षम कृती गट 2024 ची स्थापना केली आहे. प्रशात किशोर यांना परिभाषित जबाबदारीसह गटाचा भाग म्हणून पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. पण त्यांनी नकार दिला. आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचे कौतुक करतो. असे पक्षाचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी सकाळी ट्विट केले आहे.
2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी “राजकीय आव्हाने” आणि पुढील महिन्यात राजस्थानच्या उदयपूर येथे तीन दिवसीय चिंतन शिबिर होण्यापूर्वी येणारी “राजकीय आव्हाने” हाताळण्यासाठी “सक्षम कृती गटा” ची घोषणा होण्याची अपेक्षा असताना, किशोर यांच्या प्रवेशावर काँग्रेसची ही माहीती समोर आली. गेल्या आठवड्यात आठ सदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल आणि त्यावर झालेल्या चर्चेनंतर आज काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी 2024 टास्क फोर्सची स्थापना केली, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.