Tarun Bharat

प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला 362 वर्षे पूर्ण 362 मशालींनी उजळला किल्ले प्रतापगड

Advertisements

सातारा प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारा प्रतापगड किल्ला आज 362 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला.या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 362 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव साजरा करण्यात आला. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना 1661 मध्ये केली. या घटनेला आज 362 वर्षे पूर्ण झाले असुन प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये 1 मशालीची वाढ होते आहे.या वर्षी 362 मशालींनी किल्ला तेजोमय झाला .यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. महिला आणि तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.गडाच्या पूर्ण तटाच्या बाजूला मशाली पेटवण्यात आल्या. हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता.

या मशाली बनविण्याची तयारी आठवडा भर आधी करतात स्थानिक युवक
नवरात्रातील चतुर्थीला मशाली पेटविण्याची हि परंपरा 2010 पासून स्थानिक लोकांनी सुरु केली.तब्बल 13 वर्ष यात खंड पडू दिला गेला नसून मोठ्या उत्साहात हा मशाल महोत्सव साजरा केला गेलाय.

Related Stories

दहावी पुरवणी परीक्षेची आज होणार सांगता

Patil_p

कडोली येथील शेतकऱयाचा विहिरीत पडून मृत्यू

Amit Kulkarni

कुस्तीगीर संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

Amit Kulkarni

एटीएम मशीन फोडण्याचा रामतीर्थनगर येथे प्रयत्न

Amit Kulkarni

बलिदान मासाचे गांभीर्याने पालन करा

Amit Kulkarni

प्राचार्य फडके यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

Amit Kulkarni
error: Content is protected !!