Tarun Bharat

प्रतिक पवार हल्ल्याची चौकशी NIA कडे सोपवा

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे कर्जत तालुक्यातील प्रतिक पवार या युवकावर मुस्लीम युवकांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी शनिवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी 4 ऑगस्टला अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील प्रतिक पवार या तरूणावर मुस्लीम तरूणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पवार हा युवक गंभीर जखमी झाला. या हल्ल्याप्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करावी.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावती व आता कर्जत येथे घडलेली ही तिसरी घटना आहे. हिंदूवर वारंवारं हल्ले केले जात आहेत. यापुढे हे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. धार्मिक भावना दुखवल्यावर घटनेचा जरूर निषेध करावा, पण तो लोकशाही मार्गाने केला पाहिजे. शरीयतनुसार कायदा हाती घेऊन हिंदूंनां लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये. भाजपाने नुपूर शर्मा यांच्या त्या व्यक्तव्याचे समर्थन केले नाही. त्यांना पक्षातून निलंबित केले. हा विषय आता संपला असताना हिंदूवर असे हल्ले होत आहेत. अशा पद्धतीचे हल्ले पुढील काळात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

Related Stories

विवाहित महिलेबरोबर मुलगा पळून गेल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

Abhijeet Khandekar

निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींकडे द्या

Patil_p

रुग्ण वाढल्यास मुंबईतही लॉकडाऊन : पालकमंत्र्यांनी दिले संकेत

Tousif Mujawar

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,408 नवे कोरोना रुग्ण; 5,424 कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

सोलापूर : मॉल्स,मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू ठेवण्यास परवानगी

Archana Banage

तुमची मग्रुरी थांबवा!…उपकार करत नाही, घाटगेंचा मुश्रीफांना इशारा

Rahul Gadkar