Tarun Bharat

प्रथमेश मोरे, सेव्हन स्टार संघ विजयी

साईराज चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

साईराज स्पोर्टस क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एमएच बॉईज सातारा, प्रथमेश मोरे इलेव्हन स्टार संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला. नेहाल तुशामद, अमिर खान, जयदिप धनवाडे, राहुल सातव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सकाळच्या पहिल्या सामन्यात एमएच बॉईजा सातारा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 118 धावा केल्या. त्यात जयदिप धनवडेने 68, सुरज मगदूमने 16 धावा केल्या. युवा स्पोर्ट्सतर्फे लक्ष्मीकांत व आदित्य यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युवा स्पोर्ट्स क्लबतर्फे 8 षटकात 9 गडी बाद 80 धावाच केल्या. त्यात विशाल शिंदेने नाबाद 33, संकेतने नाबाद 16 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात वासुदेव स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 35 धाव केल्या. प्रथमेश मोरेतर्फे राहुल सातव, निहाल टी. यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रथमेश मोरे संघाने 2.2 षटकात बिनबाद 36 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात राहुल सातवने नाबाद 27 धावा केल्या.

तिसऱ्या सामन्यात प्रथमेश मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 85 धावा केल्या. त्यात शुभम मोरेने 24, नरसिंगने 19 धावा केल्या. सातारातर्फे जयदिप मच्छिंद्र यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमएच बॉईज साताऱ्याचा डाव 6.3 षटकात सर्व गडी बाद 31 धावात आटोपला. त्यात फैरोज नाईकवाडने 14 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे निहाल टी. ने 4 तर राहुल सातवने 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात सेव्हन स्टार संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 50 धावा केल्या. त्यात इबादतने 21 धावा केल्या. इलेव्हन स्टारतर्फे अहमदने 2 तर अमिरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इलेव्हन स्टारने 8 षटकात 3 गडी बाद 51 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अमिर खानने 19 तर रमेशने 13 धावा केल्या.

प्रमुख पाहुणे आनंद आकनोजी, विठ्ठल हुबळी, सुनिल पुजारी, राजेश लोहार, राजू राटी, अमर नाईक, समीर यळ्ळुरकर, संजय द•न्नावर, गणेश देसाई, संतोषअण्ण टोपगी, विनायक खामकर, बसवराज खामकर, निकेश कांबळे, सचिन दळवी, दौलत शिंदे, नसिम खान, प्रविण अकनोजी यांच्या हस्ते जयदिप धनवाडे, राहुल सातव, निहाल तुशामल, अमिर खान यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Related Stories

विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू : प्रवाशात समाधान

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी पंतप्रधानांचे राज्य सचिवांना पत्र

Amit Kulkarni

परमहंस गुप्तानंद महाराज यांची 69 वी पुण्यतिथी

Omkar B

एप्रिलअखेर ‘खडा पहारा’ची नोंदणी होणार

Amit Kulkarni

म्हादई पाणी वाद निकालात काढा

Amit Kulkarni

साहाय्यक उपनिरीक्षकाचा सौंदत्तीजवळ अपघातात मृत्यू

Patil_p