Tarun Bharat

प्रतीक करतोय प्रिया बॅनर्जीला डेट

अभिनेता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा पुत्र प्रतीकने 23 जानेवारी 2019 रोजी सान्या सागरसोबत विवाह केला होता. परंतु त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वर्षातच अडचणी उभ्या ठाकल्या. प्रतीक अन् सान्याने घटस्फोट घेतला आहे. प्रतीकला आता आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्याचे समजते.

प्रतीक साध्या ‘बार-बार देखो’ चित्रपटातील अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. प्रतीक अन् प्रिया हे परस्परांना एक वर्षापासून ओळखत आहेत. एका सामायिक मित्राच्या माध्यमातून त्यांची पहिली भेट झाली होती.

प्रतीक अन् प्रिया हे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. परंतु त्यांनी स्वतःचे नातेसंबंध अद्याप जाहीरपणे कबूल केलेले नाहीत. प्रिया बॅनर्जीने संजय गुप्ता यांच्या ‘जज्बा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तर प्रतीक बब्बर हा लवकरच ‘वो लडकी है कहां’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि प्रतीक गांधी हे मुख्य भूमिका साकारत आहेत.

Related Stories

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे ‘हे’ विशेष ‘१२७’ अतिथी लावणार उपस्थिती

Archana Banage

देवी सरस्वती भेदभाव करत नाही, ‘हिजाब’ प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Archana Banage

तामिळनाडूमध्ये भाजप नेते बालचंद्रन यांची हत्या

Patil_p

लष्करातील खर्चात 20 टक्के कपात

Patil_p

कुपवाडात दहशतवाद्यांचा डाव उधळला; 4 आयईडी बॉम्ब जप्त

datta jadhav

व्याजदर तेच : रिझर्व्ह बँकेचा निर्णय

Patil_p