वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातमधील नाडियाद येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या 20 व्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचा पॅरा ऑलिंपियन ऍथलीट प्रवीण कुमारने उंच उडी या प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास घडविला.
पूर्ण तंदुरूस्त असलेल्या ऍथलीट्ससाठी असणाऱया या ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा प्रवीण कुमार हा देशातील पहिला पॅरा ऍथलीट आहे. या स्पर्धेत पुरूषांच्या उंच उडी या क्रीडा प्रकारात एकूण 16 स्पर्धक सहभागी झाले होते. ग्रेटर नोयडाच्या प्रवीण कुमारने 2.05 मी.चे अंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले. टोकियो पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत प्रवीण कुमारने आपल्या वयाच्या 18 व्या वर्षी पुरूषांच्या टी 64 उंच उडीमध्ये रौप्यपदक मिळविले होते.