शिवसेनेने संभाजीराजेंची फसवणूक केली; दरेकरांचे टीकास्त्र
कोल्हापूर: शिवसेनेने काल राज्यसभेसाठी दोन उमेदवार जाहीर करून संभाजीराजे यांचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याविषय़ी भाष्य केले आहे. आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे संभाजीराजे यांच्याबद्दलचे प्रेम दिसून आलं आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
पुढे ते म्हणाले, शरद पवार साहेब यांनी पाठींबा देऊ म्हटले होते, मग आता शिवसेना अशी भूमिका कशी घेऊ शकते.संभाजीराजे यांची महाविकास आघाडी फसवणूक करत आहेत असं दिसतंय. भाजपनं याबाबत कोणतीही भूमिका मांडली नाहीत्यामुळे ही भाजपची चाल आहे असं म्हणणं चुकीचं आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं. औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण का? असा सवालही प्रविण दरेकरांनी यावेळी केला.
सरकार पुरस्कृत दंडेलशाहीला भाजप घाबरणार नाही
पुण्यातील राड्यावर प्रवीण दरेकर म्हणाले, औरंगजेबच्या थडग्याला संरक्षण का दिलं जाते.सुप्रिया सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून कारवाई केली पाहिजेअशी मागणी त्यांनी यावेळी केली. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी वक्तव्य कशी केली जाऊ शकतात. पोलिस या सगळ्याची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
रोहित पवार बुजुर्गपणाचा आव आणत आहेत
रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांच्यावर काल टीका केली यावर बोलताना दरेकर म्हणाले, रोहित पवार टीका करण्याइतके मोठे झाले नाहीत.पवार साहेब किंवा दुसरे पवार आहेत त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नये. चंद्रकांतदादा यांनी हे सगळं करायला सांगितलं आहे का? मग टीका कशाला करता असेही ते म्हणाले.