Tarun Bharat

अभिनेता प्रवीण तरडे यांनी राजकीय पक्षाची भूमिका घेण्याबाबत ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

ऑनलाईन टीम /तरुण भारत :

कलाकाराने कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेऊ नये असे मत दिग्दर्शक, लेखक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अशी भूमिका मांडली.अभिनेता हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा नसून संपूर्ण समाजाचा असतो. ‘अभिनेत्याला कोणत्याही पक्षाचे,विचारधारेचे बंधन नसते. त्यामुळे आपल्या प्रतिमेचा उपयोग राजकारणासाठी आणि राजकारणाचा उपयोग कलेच्या क्षेत्रात करणे चुकीचे आहे’.


‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता त्यांनी कलाकाराने राजकीय भूमिका घेण्याविषयीचे आपले असे मत व्यक्त केले. ‘मी जर चित्रपट काढला तर तो पाहण्यासाठी एखाद्या विशिष्ट वर्गाचेच लोक येणार असे नाही तर प्रत्येक घटकातील मनुष्य चित्रपट पाहायला येत असतो’. ‘लोक माझे चित्रपट आवडीने पाहतात, माझ्यावर प्रेम करतात यामुळे मी समाजाच या क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करत आहे’. ‘पण म्हणून राजकीय क्षेत्रांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षाची भूमिका घेणे टाळावे असं मला वाटतं.


केतकी चितळे च्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी याबाबत आपल्याला अधिक काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यावेळी आपण हंबीरराव चित्रपटाची डीसीपी काढत होतो असे त्यांनी सांगितले.

Related Stories

‘कौन बनेगी शिखरवती’ सीरिजची घोषणा

Amit Kulkarni

टेलर स्विफ्टवर गाणेचोरीचा आरोप

Patil_p

‘जब खुली किताब’चा फर्स्ट लुक सादर

Patil_p

‘सलाम वेंकी’ चित्रपटाची काजोलकडून घोषणा

Patil_p

दहन’ वेबसीरिजची घोषणा

Patil_p

हॉलिवूडमध्ये झळकणार श्रृती हासन

Patil_p