बेळगाव : बेळगावात दाखल होऊन दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केले म्हणून खासदार संजय राऊत यांच्यासह तिघांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आला. मात्र ते हजर झाले नाहीत. त्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 20 मार्च 2018 रोजी बेळगावात आले होते. त्यांनी यावेळी येथील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केली म्हणून 153-ए अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले होते. न्यायालयाने समन्स बजावला होता. मात्र संजय राऊत हजर झाले नाहीत. त्यामुळे अटक वॉरंट काढण्यात आला. त्यानंतर मुख्य जिल्हासत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांनी जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. मारुती कामाण्णाचे, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शंकर बाळनाईक यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे.
Previous Articleकॅन्टोन्मेंटच्या पेन्शनधारकांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Next Article जिल्ह्यातील ग्रा.पं.च्या 7 जागांसाठी 25 रोजी निवडणूक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.