हिंडलगा : विजयनगर हिंडलगा येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या सभागृहात भाजपा सदस्यत्व अभियानासंदर्भात महत्त्वाची पूर्वसभा घेऊन चालना देण्यात आली. या कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा सरचिटणीस व बेळगाव ग्रामीणच्या धनश्री सरदेसाई मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. प्रथम भाजपा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करून ग्रामीण भागात जास्तीत जास्त सदस्यसंख्या बनवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत उमेश पुरी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभियानास चालना देण्यात आली. याप्रसंगी भाजपा बेळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष उमेश पुरी, खानापूर विधानसभा क्षेत्र प्रभारी महेश मोहिते, सोशल मीडिया सदस्या विद्या पाटील, कोषाध्यक्ष मल्लिकार्जुन माद्दन्नावर, चेतन अंगडी उपस्थित होते. उपस्थितांच्या मार्गदर्शनानंतर आभार सिद्धाप्पा हुक्केरी यांनी मानले. तर सूत्रसंचालन पंकज घाडी यांनी केले. 2 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोबाईल नंबर 8800002024 वर मिस्ड कॉल करून शुभारंभ करणार आहेत. या पूर्वसभेला भाजपा महिला व पुरुष कार्यकर्ते शेकडोनी हजर होते.