Tarun Bharat

४ डिसेंबरला छलवादी महासभेची पूर्वसभा..

हिवाळी अधिवेशनच्या वेळी छलवादी महासभेच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती – जमातीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कारवाई करण्याचा सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन होणार आहे. यासाठी ४ डिसेम्बरला बेळगावात पूर्वसभा घेण्यात येत आहे.

आज बेळगावच्या एका खाजगी हॉटेलमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दलित नेते मल्लेश चौगुले यांनी या बद्दल माहिती दिली. अनुसूचित जाती – जमातीच्या अनेक संघटना कार्यारत असून आता एकाच मंचावर येत आहेत. ४ दिसंबरला बेळगाव जिल्ह्यातील छलवादी संघटनेच्या प्रमुखांची बैठक बोलाविण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती – जमातीच्या मुलांची विद्यावेतन रद्द केले आहे. पिटिशल ऍक्ट देखील प्रभावी बनत नाही. सरकाराने स्थापन केलेला विभाग अयशस्वी ठरला असून दररोज एक ना एक ठिकाणी दलितांवर क्षुल्लक कारणावरून हल्ले केले जात आहेत.

ग्राम पंचायतीमध्ये अनुसूचित जाती – जमातीच्या सदस्यांना योग्य माहिती देखील दिली जात नाही. एससीपी-टीएसपी अनुदानाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्या समाजाच्या स्वामीजींनी हाक दिल्याप्रमाणे चलवादी समाजाच्या नेतृत्वखाली अनुसूचित जाती – जमातीची जनता एकसंघ होऊन, पुढे वाटचाल करण्यात येणार आहे. आमदार प्रियांक खर्गे, हुबळी पूर्वचे आमदार प्रसाद अब्बय्या, चित्रदुर्ग चलवादी महापीठाचे नागेदेवीस्वामीजी यांची या बैठकीत मुख्य उपस्थिती राहणार आहे.

सुरेश तळवार बोलताना म्हणाले, बेळगावात होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान चलवादी महासभेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याची पूर्वसभा ४ डिसेम्बरला बेळगावच्या अंजुमन-ए -इस्लाम सभागृहात बोलाविण्यात आले आहे. यामध्ये आमदार प्रियांक खर्गे, हुबळी पूर्वचे आमदार प्रसाद अब्बय्या, चित्रदुर्ग छलवादी महापीठाचे नागेदेवीस्वामीजी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी दुर्गेश मैत्री, लक्ष्मण कोलकार, केडी मंत्रेशी व इतर उपस्थित होते.

Related Stories

बसचालक, वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत

Patil_p

‘घरकुल 2022’ मधून गृहनिर्माणाची माहिती

Amit Kulkarni

सीमा चळवळीचे ऊर्जास्रोत हरपल्याची भावना

Amit Kulkarni

एसपीएम रोडवर कारच्या काचा फोडल्या

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार बीसीयूमध्ये इंडो-फ्रेंच इन्स्टिट्यूट स्थापनेसाठी प्रयत्नशील

Abhijeet Khandekar

शहर परिसरात गणेश जयंती भक्तिभावाने साजरी

Amit Kulkarni