प्रतिनिधी /पणजी
पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे यांनी आज पर्वरी येथील पीएसी सभागृहात (विधानसभा ब्लॉक) पर्वरी मतदारसंघाच्या मान्स?नपूर्व तयारीबाबत सरकारी खात्यांच्या वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेतली. चर्चेदरम्यान मंत्र्यांनी पंचायत जल संसाधन खात्याच्या अधिकाऱयांना पावसाळा सुरू झाल्यामुळे नाले, गटर्स आणि नाल्यांचे गाळ उपसण्याचे काम हाती घेण्याचे आदेश दिले.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खाते, विज आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवा आणि इतर संबंधित खात्यांद्वारे करावयाच्या कामांच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. पुढे मंत्र्यांनी सर्व संबंधित खात्यांना त्यांची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि पावसाळय़ात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश दिले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी श्री गुरुदास देसाई व सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.