Tarun Bharat

मान्सूनपूर्व पावसाने झोडपले

गुरुवारी दुपारी झालेल्या पावसाने साऱयांचीच उडाली तारांबळ : पेरणी केलेल्या पिकांना पोषक

प्रतिनिधी / बेळगाव

मान्सूनपूर्व पावसाने गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास जोरदार सुरुवात केली. जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि गारांसह पावसाचे आगमन झाले. अचानकपणे  पाऊस सुरू झाल्यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. पावसाला जोर असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागांमध्ये पाणी साचून राहिले होते.  अनेक ठिकाणी गटारी भरून पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे वाहनचालक, पादचाऱयांची चांगलीच दैना उडाली.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता मान्सूनला सुरुवात होईल, अशी शक्मयता असतानाच मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा हजेरी लावली. जोरदार पावसामुळे साऱयांनाच आडोसा शोधावा लागला. बाजारपेठेतील व्यावसायिकांची तसेच खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाली.

गुरुवारी सकाळपासून ऊन होते. दुपारी आकाशात ढग धरून काही वेळातच जोरदार पाऊस पडला. या पावसाबरोबरच गारांचा माराही
सहन करत अनेकांनी आडोसा शोधला.

आठ-दहा दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे शहराची दैना उडाली होती. त्यानंतर गेले काही दिवस पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱयांनी शिवारातील कामे सुरू केली होती. भातपेरणी व मशागतीची कामे आटोपती घेतली होती. काही भागांमध्ये भातपेरणीदेखील पूर्ण केली आहे तर काही ठिकाणी पेरणीच्या तयारीत आहेत. मात्र गुरुवारी दुपारीच दमदार पावसाला सुरुवात झाल्याने कामामध्ये व्यत्यय निर्माण झाला. मात्र, पेरणी झालेल्या भात पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे.

जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गटारी तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत होते. बाजारहाट व कामासाठी मोठय़ा प्रमाणात जनता शहरात आली असताना दुपारीच झालेल्या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांनी वाहने रस्त्याशेजारी पार्किंग करून आडोसा घेतला. काहींनी पावसात भिजतच घराकडे जाणे पसंत केले. भाजीविपेते, फेरीवाले व इतर व्यापाऱयांना या पावसाचा चांगलाच फटका बसला.

हवामान खात्याने मान्सून येत्या काही दिवसांमध्ये कर्नाटकात दाखल होईल, असा अंदाज वर्तविला आहे. सकाळी ढगाळ वातावरण दिसत होते. त्यामुळे मान्सूनची चाहूल साऱयांना लागली होती. असे असताना त्यापूर्वीच वळिवाने दमदार सलामी दिली. यामुळे बळीराजा सध्या सुखावला आहे. भातपेरणीच्या कामात गुंतला आहे. शेतकऱयांना मशागत करण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.

Related Stories

एअरमन टेनिंग स्कूलतर्फे मिनी मॅरेथॉन

Amit Kulkarni

मोटार सायकल चोरी प्रकरणी युवकाला अटक

Patil_p

मराठी भाषा-संस्कृतीच्या अस्मितेसाठी लोक लढा गरजेचा

Patil_p

म्हणे काळादिन पाळणाऱयांविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल

Patil_p

वडगाव मंगाई देवीची यात्रा यंदाही रद्द

Amit Kulkarni

म. ए. समितीतर्फे पंच कमिटीचे अभिनंदन

Amit Kulkarni