Tarun Bharat

मतदानपूर्व सर्वेक्षणाचे कल भाजपच्या बाजूने

Advertisements

गुजरात, हिमाचल प्रदेशात लवकरच निवडणूक

@ वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही दिवशी होऊ शकते. सी व्होटर या संस्थेने दोन्ही राज्यांमध्ये मतदानपूर्व (ओपिनियन पोल) सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्ता राखण्यास यशस्वी ठरण्याची शक्यता आहे.

दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकरता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आम आदमी पक्षाच्या वतीने अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे अध्यक्ष निवडणुकीच्या गुंत्यात अडकून पडलेला काँग्रेसही निवडणुकीची तयारी करत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आम आदमी पक्ष तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये भाजपला या ओपिनियन पोलनुसार मागील वेळेपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची मोठी पिछेहाट होण्याची चिन्हे आहेत.  आम आदमी पक्षाने प्रचाराला वेग दिला तरीही त्याला फारसे मोठे यश मिळणार नसल्याचा ओपिनियन पोलचा निष्कर्ष आहे. गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजपला 99 जागा जिंकता आल्या होत्या. तर काँग्रेसने 77 जागांवर यश मिळविले होते. ओपिनियन पोलमध्ये यावेळी भाजपला आघाडी दिसून येत आहे. तर काँग्रेसला मोठे नुकसान होणार असल्याचा अनुमान आहे.

गुजरातला कुणाला किती जागा (एकूण जागा-182)

भाजप             135-143

काँग्रेस             36-44

आप                0-2

अन्य               0-3

हिमाचलमध्ये भाजपच वरचढ?

हिमाचल प्रदेशात सध्या भाजप सत्तेवर आहे. या राज्यात दर 5 वर्षांनी सत्तांतर होण्याचा इतिहास राहिला आहे. परंतु यावेळी हे चित्र बदलण्याची शक्यता असल्याचे ओपिनियन पोलचे निष्कर्ष दर्शवत आहेत. काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व नसल्याने भाजपला लाभ होण्याची शक्यता आहे. तर राज्यात तुलनेत नवा असलेला आम आदमी पक्षाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. मागील निवडणुकीत भाजपने राज्यात 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 21 जागांवर समाधान मानावे लागले होते. 2017 प्रमाणेच आगामी निवडणुकीत पक्षीय बलाबल राहणार असल्याचा अनुमान आहे.

हिमाचलमध्ये कुणाला किती जागा (एकूण 68)

भाजप             37-45

काँग्रेस             21-29

आप                0-1

अन्य               0-3

Related Stories

अध्यक्षीय व्यवस्थेच्या प्रयत्नात संघ ; चिदंबरम

Patil_p

पेटीएमच्या तोटय़ात वाढ

Patil_p

आरोग्य निधीमध्ये 137 टक्के वाढ

Patil_p

मित्रांनीच सिद्धूची हत्या केली; मुसेवालाच्या वडिलांचा आरोप

Archana Banage

मागील 16 दिवसांत 10 रुपये इंधनदरवाढ

Patil_p

समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट

Patil_p
error: Content is protected !!